mumbai high court orders to state government on maratha reservation report
mumbai high court orders to state government on maratha reservation report 
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासंबंधीचा संपूर्ण अहवाल जाहीर करा : उच्च न्यायालय

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे.

'राज्य मागासवर्ग आयोगाचा आरक्षणासंदर्भातील अहवाल जाहीर झाल्यास समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून अहवालातील संवेदनशील भाग वगळून तो जाहीर करण्यास हरकत नाही.' ही मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. मागासवर्गाचा संपूर्ण अहवाल कोणताही भाग न वगळता याचिकादार व प्रतिवाद्यांना देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. 

न्या. रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या घटनापीठाने हे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणविरोधातील याचिका मागे घेतली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT