Narayan Rane
Narayan Rane  Sakal Digital
महाराष्ट्र

नारायण राणेंना धक्का; अधीश बंगल्यासंदर्भातील याचिका फेटाळली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसून, राणेंच्या जुहुतील अधीश बंगल्याच्या कारवाई विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) याचिका फेटाळून लावली आहे. तसेच सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाद मागण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या बंगल्यावरील कारवाईला 6 आठवड्यापर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. (Narayan Rane News)

महापालिकेने नारायण राणे यांचे आलिशान निवासस्थान असलेल्या ‘अधीश’ बंगल्याविरोधात नोटीस बजावली होती. त्याविरोधात राणेंनी उच्च न्यायालयात नवीन याचिकेद्वारे आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. राणेंच्या पत्नी नीलम आणि मोठा मुलगा नीलेश संचालक असलेल्या ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज’ कंपनीच्या नावे ही नोटीस पाठवण्यात आली होती.

या कंपनीत राणेंचे बरेच शेअर्स असल्याने कंपनीच्या मालकीच्या या बंगल्यात त्यांचे वास्तव्य आहे. या अकरा मजली इमारतीत राणेंनी काही बांधकाम नियमबाह्य पद्धतीने केले असून ते बेकायदा असल्याने पाडावे लागेल, असा इशारा नोटिशीमार्फत देण्यात आला होता. त्यानंतर इमारतीचे बांधकाम नियमित करण्यासाठी राणेंनी पालिकेत अर्ज दाखल केला. तो ३ जून रोजी पालिकेने फेटाळून लावला. त्यामुळे राणे यांनी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT