Uddhav-Thackeray-Mumbai-Local 
महाराष्ट्र बातम्या

मुंबई लोकल होणार सुरू.. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी!

मुंबई लोकल होणार सुरू.. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना परवानगी! दोन डोस घेतले असले तरीही आणखी एक महत्त्वाची अट Mumbai Local Train Travel Allowed from 15th August if 2 doses are taken of Covid 19 Vaccine Says CM Uddhav Thackeray vjb 91

विराज भागवत

दोन डोस घेतले असले तरीही आणखी एक महत्त्वाची अट

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला. मुंबईतील लोकल सेवा स्वातंत्र्यादिनापासून सर्वसामान्यांसाठी सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सुरु होतील. मात्र, ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळवून देण्याची सुविधा असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री आठ वाजता जनतेला संबोधित केलं. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.

राज्यभरातून कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्र्यांनीही निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबोधनात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता केली. महाराष्ट्राच्या जनतेशी ते काय संवाद साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मुख्यमंत्री कोरोना निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. स्वातंत्र्यदिनापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून मुंबईची लोकल सुरु करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला.

कार्यालयीन कामाच्या वेळेची विभागणी करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन कामाच्या वेळांची विभागणी करण्याचे आवाहन उद्योजकांना केलं. "गर्दी करु नका. त्यासाठी कार्यालयीन कामाच्या वेळेची विभागणी करायला हवी. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य ते करतील. उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करायला हवी. परत लॉकडाऊन लावायची वेळ आलीच, तर कर्मचाऱ्यांना गावी जावं लागणार नाही. यासाठीचं नियोजन आतापासूनच करा", अशाही त्यांनी सूचना दिल्या.

नियम पाळणं अत्यंत गरजेचं...

ठाकरे म्हणाले की, कोरोना आहे. आता एकेक सण येतील. गेल्यावर्षी सणांनंतरच दुसरी लाट आपण अनुभवली. त्यामुळे आपण अनुभवातून आपण शिकलोय की, कोविड थोपवायचा असेल तर नियम पाळावे लागतील. लसीकरणाची गती वाढवलीय. पण जोपर्यंत लसीकरण एका ठराविक टक्क्यांपर्यंत होत नाही, तोवर आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT