महाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील एका जागेची पोटनिवडणूक 7 डिसेंबर रोजी होत आहे. विधानसभेतील भाजपचे संख्याबळ, निवडून येण्यासाठी आवश्‍यक 145 मतांचा कोटा आणि शिवसेनेचा असलेला तीव्र विरोध या पार्श्‍वभूमीवर राणेंनी पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणार असून, नवीन वर्षात राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असून, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या धर्तीवर राणे घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात असतील. नारायण राणे यांच्यासह मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय होता. मात्र, राणेंच्या नावाला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असता ठाकरे यांनी कोणताही शब्द दिला नाही. त्यामुळे विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राणे यांना वगळून अन्य उमेदवार देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. येत्या जून आणि जुलै 2018 मध्ये विधान परिषदेतील विधानसभा सदस्यांतून निवडून द्यावयाच्या 11 जागा रिक्‍त होत आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार, कॉंग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. या निवडणुकीत 26 मतांची आवश्‍यकता असल्याने राणे यांना निवडून आणण्यात भाजपला अडचण नाही. तसेच, मंत्रिपदावर असलेल्या व्यक्‍तीला सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे नवीन वर्षात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राणे सहा महिन्यांच्या आत विधान परिषद सदस्य होतील.

विधानसभेतील पक्षीय संख्याबळ
भाजप- 122, शिवसेना- 63, कॉंग्रेस- 42, राष्ट्रवादी कॉंग्रेस- 41,
शेकाप- 3, बविआ- 3, एमआयएम- 2, अपक्ष- 7, सपा- 1, मनसे- 1, रासपा- 1, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- 1.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT