महाराष्ट्र

छप्पर फाडके! माऊथवॉशऐवजी मिळाला MI Note10

शर्वरी जोशी

अनेकांना ऑनलाइन शॉपिंग करण्याची आवड असते. अगदी कपड्यांपासून दैनंदिन जीवनातील किरकोळ वस्तीदेखील अनेक जण ऑनलाइन मागवतात. मात्र, अनेकदा ऑनलाइनच्या नादाच चुकीच्या वस्तूंची डिलीव्हरीदेखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात काहींना लाखोंचा गंडा बसला आहे. तर,काहींना मात्र चांगलाच फायदा झाला आहे. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका व्यक्तीला माऊथवॉशऐवजी (mouthwash ) चक्क Red Note10 मोबाईल मिळाला आहे. (mumbai man orders mouthwash from amazon but redmi note 10 delivered home and then)

मुंबईत राहणाऱ्या लोकेश डागा (Lokesh Daga) व्यक्तीने अॅमेझॉन या इ- कॉमर्स साईटवरुन ५०० रुपयांचा एक माऊथवॉश मागवला होता. विशेष म्हणजे या कोरोना काळात योग्यवेळी डिलिव्हरी मिळाल्यानंतर लोकेश डागा यांना माऊथवॉशऐवजी चक्क Red Note10 हा मोबाईल फोन मिळाला. मात्र, या प्रकारानंतर लोकेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कंपनीला टॅग केलं आहे. तसंच घडलेला प्रकारदेखील सांगितला आहे.

"मी अॅमेझॉनवरुन ORDER # 406-9391383-4717957 या ऑर्डर क्रमांकाच्या माध्यमातून कोलगेटचं माऊथवॉश मागवलं होतं. मात्र, त्याबदल्यात मला @RedmiIndia नोट 10 मिळाला आहे. त्यातच माऊथवॉश कंज्युमेबल प्रोडक्ट असल्यामुळे ते रिटर्न देण्यास अडचण येतं आहे. त्यामुळे मला हा फोन रिटर्न करण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नाहीये", असं ट्विट लोकेश यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणतात, "कंपनीकडून आलेल्या पार्सलवर माझं नाव होतं. मात्र, इनव्हॉइसवर अन्य दुसऱ्या व्यक्तीचं नाव होतं."

दरम्यान, लोकेश यांनी १० मे रोजी कोलगेट माऊथवॉशच्या चार बाटल्या ऑर्डर केल्या होत्या. ज्यांची किंमत ३९६ इतकी होती. परंतु, त्याऐवजी त्यांच्या घरी १४ हजार रुपयांचा Red Note10 हा फोन आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या चार विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT