महाराष्ट्र बातम्या

'बर्ड फ्लू'चा कहर सुरूच, 7 लाख कोंबड्या केल्या नष्ट; मात्र गैरसमजुतींपासून दूर राहा 

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 14 : राज्यात 'बर्ड फ्लू'चा कहर अद्याप सुरूच आहे. जळगाव,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात हा संसर्ग पसरला आहे. खबरदारी म्हणून आतापर्यंत 7 लाख 12 हजार 172 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.  

राज्यात काल  कुक्कुट पक्षामध्ये जळगांव 19, अमरावती 50 आणि बुलडाणा येथे 65 अशी कुक्कुट पक्षांमध्ये एकूण134 इतकी मृत झाली. बगळे पोपट, चिमण्या अशा अन्य इतर एका पक्षाची आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात 16 कावळे मृत आढळून आले आहेत. राज्यात शनिवारी एकूण 151 पक्षामध्ये मरतुक झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 7 लाख 12 हजार 172 कुक्कुट पक्षी, 19 लाख 68 हजार 181 अंडी व 72 हजार 974 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी नष्ट करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत रू. 45.40 लक्ष अनुदान वाटप करण्यात आले आहे.

अफवा आणि गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन पशु संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. कुक्कुट पक्षांचे मांस व अंडी हा प्रधिनाचा स्वस्त असणारा स्तोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

mumbai news amid bird flu seven lac chicken birds disposed but stay away from rumors


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT