महाराष्ट्र

ताडीत भेसळ करणारे जेरबंद 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ताडीत नशा आणण्यासाठी केमिकलचा वापर करणारे रॅकेट राज्य उत्पादन विभागाने (एक्‍साईज) उद्‌ध्वस्त केले. अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात "क्‍लोरल हायड्रेट'सदृश घातक भुकटीचा साठा जप्त करण्यात आला. ही भुकटी गुंगी आणण्यासाठी ताडीमध्ये वापरली जाते. सातारा, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, कांदिवली, मिरा-भाईंदर येथे ही कारवाई करण्यात आली. पुणे येथून पकडलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली आणि भिवंडी येथे छापा घालून अशीच घातक रसायने एक्‍साईज विभागाने जप्त केली आहेत. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून, इतर दोघे फरारी आहेत. 

उत्पादन शुल्क विभागाने 6 नोव्हेंबरला पुण्यातील काळेवाडी येथे छापा घालून ताडीचा बेकायदा साठा, क्‍लोरल हायड्रेट पावडर, यिस्ट जप्त केले. या प्रकरणात संतोष मोगलय्या गुत्तेदार (वय 32) याला अटक करण्यात आली. परेश सुंटले फरारी आहे. गुत्तेदार याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात अस्मिता केमिकल्स या कंपनीत घातक रसायनांचा साठा सापडला. सेंट्रिफ्यूज मशीन, लोखंडी रिऍक्‍टर, वजन काटा, रिकामे ड्रम आदी साहित्यही अधिकाऱ्यांनी जप्त केले. कंपनीचा मालक मिलिंद तुकाराम घाडगे आणि कामगार दिनकर नलावडे यांना घटनास्थळी अटक करून 30 लाख 71 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

भिवंडीतील पूर्णा नाका येथील गोदामात क्‍लोरल हायड्रेटचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मिरा-भाईंदर व कांदिवली येथील ताडी विक्रीच्या बेकायदा अड्ड्यांवर छापे घालण्यात आले. तेथे क्‍लोरल हायड्रेटमिश्रित ताडीविक्री करणाऱ्या पाच जणांना अटक करून पिंपरी न्यायालयात 13 नोव्हेंबरला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT