महाराष्ट्र

कैदी आत्महत्या रोखण्यासाठी लवकरच "ऑपरेशन ट्रॅकिंग' 

मंगेश सौंदाळकर

मुंबई - कैद्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता तुरुंग प्रशासनाने "ऑपरेशन ट्रॅकिंग' उपक्रम सुरू केला आहे. नैराश्‍यामुळे तणावाखाली असलेल्या कैद्यांची यादीच तयार करण्यात येणार आहे. राज्यात तीन वर्षांत 15 कैद्यांनी आत्महत्या केली आहे. 

हिंसक होणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार असल्याची माहितीही विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची संख्या मोठी आहे. अनेक कैद्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यास येत नाहीत. "पॉक्‍सो' आणि बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झाल्यानंतर अशा कैद्यांची जामिनावर सुटका होणे किंवा ते पॅरोलवर बाहेर येणे कठीण असते. त्यामुळे ते नैराश्‍यात आत्महत्या करतात. महिनाभरापूर्वी कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात अशाच एका कैद्याने आत्महत्या केली. त्याची गंभीर दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठीच "ऑपरेशन ट्रॅकिंग' हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व अधीक्षकांना माहिती गोळा करून ती तुरुंग प्रशासनाकडे पाठवावी लागणार आहे. त्या माहितीच्या आधारावर तुरुंग प्रशासन एक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

किरकोळ आणि गंभीर गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बराकीत ठेवले जाते. कित्येकदा किरकोळ कारणांनी किंवा जुन्या वादातून कैद्यांमध्ये हाणामाऱ्या होतात. असे प्रकार ऑर्थर रोड तुरुंग आणि तळोजा तुरुंगातही घडले आहेत. हिंसक आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले जाणार आहे. कैद्यांचे आपसात वाद झाले तर त्यांना वेगवेगळ्या बराकीमध्ये ठेवण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. 

कैदी आत्महत्या करतात. त्यांच्यात हाणामारीचे प्रकारही घडतात. नैराश्‍यात असलेल्या कैद्यांचे समुपदेशन आणि त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक, तुरुंग प्रशासन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT