महाराष्ट्र

योगी आदित्यनाथ गुंतवणुकीसाठी मुंबईत

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.22) मुंबईत औद्‌योगिक गुंतवणुकीसाठी येत असून, टाटा, रिलायन्स, बजाज यांच्यासह अनेक मोठे उद्‌योजक ट्रायडन्ट हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशाच्या उद्‌योगविकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी व आर्थिक गुंतवणुकीच्या निमित्ताने लखनौ येथे 21 व 22 फेब्रुवारीला "इन्व्हेस्टर्स समिट -2018' चे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उद्‌योगांना आकर्षित करण्याच्या हेतूने योगी आदित्यनाथ येत आहेत. या वेळी उत्तर प्रदेशात उद्‌योगांची स्थापना व रोजगार याबाबतचे धोरण ते जाहीर करणार आहेत. यामधे रोजगार प्रोत्साहन, स्टार्ट अप, कृषी व अन्न प्रक्रिया उद्‌योग यासंबंधीची धोरणं जाहीर होणार आहेत.

या कार्यक्रमात रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी, टाटा ट्रस्टचे रतन टाटा, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, महेंद्रा ऍण्ड महेंद्राचे पवन गोयनका, एस्सेल ग्रुपचे सुभाष चंद्रा, हिन्दुजा ग्रुपचे अशोक हिन्दुजा, एच.डी.एफ.सी.चे दीपक पारेख, बजाज इलेक्‍ट्रिकल्सचे शेखर बजाज, अरविंद ग्रुपचे अरविंद लालभाई, टॉरेण्ट ग्रुपचे सुधीर मेहता, अजंता फार्माचे मधुसूदन अग्रवाल, गीतांजली ग्रुपचे मेहुल चोकसी आदी उद्योजक सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT