Mantralaya News esakal
महाराष्ट्र बातम्या

Mantralaya News : सहाव्या मजल्यावरुन उडी; मंत्रालयामध्ये तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

संतोष कानडे

मुंबईः आज मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती.

हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

दरम्यान उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव बापू मोकाशी (43) असून दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या आधी घडलेल्या अशाच घटनांनंतर अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.

मोकाशी यांना या घटनेनंतर पोलिसांनी जाळीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

Solapur Municipal Result:'साेलापूर जिल्ह्यात शिसेनेने रोखली भाजपची विजयी घोडदौड'; हॅट्ट्रिक पुसून भालकेंची नवी इनिंग..

Viral Video: झोमॅटोचा केक पाहून महिला थक्क! वाढदिवसाच्या केकवर लिहिलं असं काही की डोक्याला हात लावला

Bribery Case : संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक; तब्बल 2.23 कोटींची रोकड जप्त, CBI ची मोठी कारवाई

Satej Patil : आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट; नगरपालिकांच्या निकालाने बदलले समीकरण, काय असणार पुढची रणनीती?

SCROLL FOR NEXT