Hemant-Nagrale on Bulli Bai case sakal media
महाराष्ट्र बातम्या

Bulli Bai : आरोपींची मोडस ऑपरेंडी काय? पोलिसांनी दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बुल्ली बाई अॅपवरून (Bulli Bai Case) मुस्लीम महिलांची बदनामी केली जात आहे. त्यांच्या फोटोचा लिलाव देखील करण्यात आला. याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Probe In Bulli Bai Case) आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आज मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींची मोडस ऑपरेंडी सांगितली.

बुल्ली बाई प्रकरणी तीन दिवसांपासून तपास सुरू आहे. अजून बराच मोठा तपास करण्याचा बाकी आहे. आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये साठी काही गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर वेब बेस्ड बुल्ली बाई नावाचे अॅप तयार करण्यात आले. विशिष्ट समाजाच्या महिलांचे फोटो साईटवर अपलोड करण्यात आले होते. त्यामधून भावना दुखावणारा संदेश या साईटवरून देण्यात आला. 31 डिसेंबरला अॅप डेव्हलप करण्यात आले. आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर २ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिस आयुक्त नगराळे यांनी दिली.

काय होती मोडस ऑपरेंडी? -

या अॅपचं आणि ट्विटर हँडलचं निरीक्षण करण्यात आलं. बुल्ली बाई नावाचं ट्विटर हँडल तयार करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश होता. या अॅपचे फॉलोअर्स कोण आहेत? याबाबत माहिती काढली आणि त्यांच्या मागावर गेलो. यावेळी बंगळुरूमधील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. हा आरोपी वेबसाईटचा फॉलोअर आहे. या वेबसाईटला फक्त पाच फॉलोअर्स आहेत. ज्यांच्या नावाने ट्विटर हँडल सुरू झाले त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोहोचले. आतापर्यंत याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक विशाल झा, दुसरी आरोपी श्वेता सिंह आणि तिसरा आरोपी हा उत्तराखंड येथील आहे, असं नगराळे यांनी सांगितलं.

तपास अजून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या पाळामुळं खोदून काढणयाचं काम मुंबई पोलिस करतील. अशा प्रकारच्या घटना पुढे होऊ नये याकरता नागरिकांना विशेषतः महिला व मुलींना सुचित करण्यात येईल, असंही नगराळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT