mumbai politics Devendra Fadnavis statement will meet sanjay Raut  
महाराष्ट्र बातम्या

वेळ मागितली तर राऊतांना भेटेन; देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण : राजकीय कटुता दूर झालीच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राजकारणातील कटुता संपण्याची अपेक्षा करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळ मागितली; तर ती देऊन राऊत यांना भेटेन, असे स्पष्ट केले. ‘राजकारणातील कटुता दूर झालीच पाहिजे,’ याकडे फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले.

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात असलेल्या राऊत यांची बुधवारी जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पुन्हा राजकीय संघर्षाची तयारी दाखविलेल्या राऊत यांनी फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात नव्या राजकारणांची नांदी होणार का, याची चर्चा रंगत आहे. महाविकास आघाडी सूत्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप, आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय वैर वाढत गेले.

या पार्श्वभूमीवर राऊत हे फडणवीस यांना भेटणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच राऊत यांना भेटेन, असे फडणवीस यांनी माध्यमांपुढे स्पष्ट केले. त्यामुळे यापुढील काळात फडणवीस-राऊत यांच्या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे. देशभरातील सर्व निवडणुका एकत्रित झाल्या; तर त्यातून वेळ आणि पैसा वाचणार आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ ला माझी सहमती आहे,’’ अशी भूमिकाही फडणवीस यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मांडली.

जामीन रद्द करण्याबाबत आज सुनावणी

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात खासदार संजय राऊत यांना मंजूर झालेला जामीन रद्दबातल करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता शुक्रवारी (ता. ११) यावर सुनावणी होणार आहे. ईडीने बुधवारी तातडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून जामिनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्या. भारती डांग्रे यांच्या न्यायालयात उद्या यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता ईडीने विशेष न्यायालयात याप्रकरणी आरोप निश्चित करण्यासाठी अर्ज केला आहे.

राऊतांनी घेतली पवारांची भेट

मुंबई : ‘भारत जोडो’ हे आंदोलन असल्याने भारतीय जनता पक्षाने त्याचे स्वागत करायला हवे, अशी अपेक्षा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी व्यक्त केली. सरकार कोणाचेही असले; तरीही कामाचे कौतुक व्हावे, असेही राऊत यांनी सांगितले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी माध्यमांपुढे आपली भूमिका मांडली.‘‘तुरुंगात असताना पवार यांना माझ्यासह कुटुंबाची काळजी होती. या काळात ते कुटुंबीय आणि माझ्या वकिलांसोबत बोलत होते,’’ असे राऊत यांनी सांगितले. या भेटीत पवार आणि राऊत यांच्यातील राज्यातील राजकारण, महाविकास आघाडीचा अजेंडा आणि पुढच्या निवडणुका या बाबींवर चर्चा झाल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

ZP Election Mangalwedha : नगरपालिका पराभवानंतर भाजपची सावध खेळी; जिल्हा परिषदेसाठी आवताडे–परिचारक गटात समझोता?

IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत

Mumbai Firing Incident : मोठी बातमी! मुंबईत गोळीबाराची घटना, सोसायटीवर फायरींग करत आरोपी फरार

Pune Political Shift : शरद बुट्टेपाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार; उत्तर पुण्यात भाजपला मोठा धक्का!

SCROLL FOR NEXT