Mumbai Rain Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Rain: मुख्यमंत्री महोदय…. कोणी गाडीच्या टपावर..तर कोणी गाडीला ठेवले बांधून..मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार Video Viral

पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

काल शनिवारी मुंबई आणि पुण्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. तर पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. कालच्या पावसाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

तर 'मुख्यमंत्री महोदय, आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आल्याचं दिसुन येत आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी! अशा पोस्ट सोशल मिडियावर फिरू लागल्या आहेत.(Latest Marathi News)

काल झालेल्या पावसामध्ये अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.(Latest Marathi News)

सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या असे प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना करत आहेत, तर पावसाळ्यापूर्वी मुंबईत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे.(Latest Marathi News)

पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहील आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 2 दिवसांत सोनं 57,100 रुपयांनी महागलं! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Pune Nashik Railway: मोठा निर्णय! पुणे-नाशिक रेल्वेच्या मूळ मार्गासाठी काकोडकर समिती; दोन महिन्यांत अहवाल

Amba Ghat Traffic Update : आंबाघाटातून 900 ट्रकची वाहतूक ठप्प! अवजड वाहनांना बंदी; बॉक्साईट, साखर, कोळसा वाहतुकीवर परिणाम, पाहा काय आहे पर्यायी मार्ग?

Marathi News Live Updates : प्रशांत किशोर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल

NEET Paper: दहावीत ९२ टक्के, अकरावीपासून नीटची तयारी, पेपरफुटीनंतर लेकानं आयुष्य संपवलं; इतरांवर अशी वेळ येऊ नये, आईने घेतली दीपकेंची भेट

SCROLL FOR NEXT