महाराष्ट्र बातम्या

CM Shinde : अभिनेत्याचा 'कार'नामा! सी-लिंकवर टोल वाचावा म्हणून मुख्यमंत्र्याच्या ताफ्यातून नेली कार; पोलिसांनी घडवली अद्दल

शुभम कुमार हा त्याच्या कुटुंबासह कारमध्ये होता. सोमवारी त्यांने आपली कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून नेली. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने त्याला थांबण्याची सूचना केली. मात्र तो थांबला नाही.

संतोष कानडे

मुंबईः मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी लिंकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला फॉलो करणाऱ्या ३० वर्षीय अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शुभम कुमार असं या तरुणाचं नाव असून त्याने व्हीआयपी लेनमध्ये घसून टोल ओलांडला होता.

वांद्रे पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, शुभम कुमार हा त्याच्या कुटुंबासह कारमध्ये होता. सोमवारी त्यांने आपली कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून नेली. ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने त्याला थांबण्याची सूचना केली. मात्र तो थांबला नाही.

शुभम कुमार याने कार थांबवली नसल्याने त्याला वरळीजवळ पकडण्यात आलं आणि वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली.

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने ठाण्यातूनच मुख्यमंत्र्यांचा ताफा फॉलो केल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री त्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा'कडे जात होते. वरळी सी लिंकवरुन जाताना टोल भरावा लागू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा फॉलो केल्याचं त्यांने सांगितलं.

शुभम कुमार याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये निष्काळजीपणे वाहन चालविणे आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. 'डेक्कन हेराल्ड'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT