Mumbai serial blast convict Jalees Ansari is missing
Mumbai serial blast convict Jalees Ansari is missing  
महाराष्ट्र

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस फरार

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील 1993मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला आहे. कुटूंबियांच्या भेटीसाठी तो मागच्या वर्षी पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता. फरार झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी जलीस बेपत्ता झाल्याची तक्रार अग्रीपाडा पोलिसांत नोंदवली आहे. 

1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात जलीसचा हात होता. याशिवाय 50 हून अधिक साखळी बॉम्बस्फोटात जलीस आरोपी होता. आज जलीसच्या पॅरोलची मुदत संपणार होती आणि काल तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. आज जलीसला अजमेर तुरूंगात हजर राहण्यास सांगितले मात्र त्यापूर्वी गुरूवारीच फरार झाला आहे. 

अजमेर बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी म्हणून जलीसला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमी या दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. पाकिस्तानात बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्याने घेतले होते. अजमेरसह जयपूर आणि मालेगाव बॉम्बस्फोटात तो सहभागी असल्याची आरोप त्याच्यावर होता. काल जलीसचा मुलगा जैद याने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र एटीएस आणि क्राईम ब्रान्च विभाग त्याचा शोध घेत आहेत.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT