Yakub Meman
Yakub Meman Sakal
महाराष्ट्र

Yakub Memon: मेमनच्या कबरीची सजावट; रक्तपात घडवणाऱ्याचं उदात्तीकरण?

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभन केल्याची माहिती समोर आली आहे. कबरीच्या बाजूने संगमरवरी फरशी लावण्यात आली असून एलईडी दिवे लावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईमध्ये रक्तपात घडवून आणलेल्या याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(Yakub Memon Grave Decoration Updates)

दरम्यान, १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात कित्येक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर २०१५ साली त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली होती. आता त्याच्या कबरीला संगमरवरी फरश्या लावण्यात आल्या असून एलईडी बल्ब लावण्यात आल्याची माहिती आहे. रक्तपात घडवून कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या मेमनचे उदात्तीकरण करण्यात येतंय का? असा प्रश्न निर्माण होत असून अनेक नेत्यांकडून याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकरणाचं उत्तर द्यावं लागेल असं वक्तव्य भाजपच्या राम कदम यांनी केलं आहे तर असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती असून मुंबईतील बडा कब्रस्तानचे कर्मचारी याच्याकडून या आरोपाचे खंडन करण्यात आले आहे. शब ए बारातला या दफनभूमीला रोषणाई करण्यात आली आहे. तर सध्या जो फोटो व्हायरल होत आहे तो जुना असल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT