Mumbai Crime  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Crime Video : तरुणीचे हातपाय तोडून गोणीत भरले; मुंबईत एकीकडे सत्तासंघर्ष दुसरीकडे गुन्हेगारीचा कळस

संतोष कानडे

मुंबईः मुलींचा जीव घेऊन मृतदेहाचे तुकडे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्या मुंबईत सध्या सत्तेचा सारिपाट मांडला जात आहे, त्याच मुंबईत एका तरुणीचा जीव घेऊन तिचे तुकडे केल्याचा प्रकार समोर आलेला आहे.

राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. वरळी 'सी फेस' वर गोणीत तरुणीचा मृतदेह सापडला आहे. हात-पाय तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला आहे. तरुणीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतंय.

सदरील तरुणीचं वय १८-२० वर्षांच्या दरम्यान होतं. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञाताविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुंबईत तरुणी-महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरळी कोळीवाडा येथील आयएनएस राहताचा पाठीमागे काल संध्याकाळी मृतदेहाची गोणी काही लोकांना आढळून आली. गोणीत तरुणीचे हायपाय तोडून भरलेले होते आणि त्याचा उग्र वास सुटला होता.

सुरुवातीला घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणीची अद्याप ओळख पटली नसून तिचं वय अंदाजे 18 ते 20 या असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

Pune : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूतील कारखान्यात गॅस गळतीमुळे मृत्यू झालेले पाचही जण ओडिशामधील; मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू

Fifa World Cup 2026 : यमाल दे धमाल! स्पेनच्या Lamine Yamal ने इतिहास घडविला; पेले यांच्यानंतर तोच... मेस्सीचाही विक्रम मोडला

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

SCROLL FOR NEXT