Mungantiwar questions to Uddhav Thackeray; If there was no experience then why he became the Chief Minister Mungantiwar questions to Uddhav Thackeray; If there was no experience then why he became the Chief Minister
महाराष्ट्र बातम्या

मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; ...तर मुख्यमंत्री का झाले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे ठरले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्यास सांगितले. त्यांनी म्हटले म्हणून मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. महानगर पालिकेचाही अनुभव नव्हता तर का झाले मुख्यमंत्री, असा उलट प्रश्न भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. (Mungantiwar questions to Uddhav Thackeray; If there was no experience then why he became the Chief Minister)

महानगर पालिकेचाही अनुभव नसताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री होण्यास सांगितले. त्यांनी म्हटले म्हणून मुख्यमंत्री झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्हाला अनुभव नव्हता तर मुख्यमंत्री होण्यास नकार द्यायला हवा होता. राज्याच्या हितासाठी दुसऱ्याला पद द्यायला हवे होते. गाडी चालवण्याचा अनुभव नाही तर चालकाच्या सीटवर बसले कशाला? अपघात करायला का, असा प्रश्नही सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणातील मुद्दे हास्यास्पद आहेत. ठाकरे कुटुंबात सत्ता आणि सत्तेची वासना कधीही नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मनात सत्तेची वासना निर्माण झाली. यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली. आता म्हणतात मी पदाचा लालची नाही, असाही टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

२४ ऑक्टोबर २०१९ रोजी देशातील जनतेने शिवसेना (Shiv sena) आणि भाजपला (Bjp) निवडून दिले होते. त्यावेळी आम्ही सुद्धा शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी भावनिक आवाहन केले होते. मात्र, त्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. आता त्यांच्या भावनिक आवाहनाला कोणताही आमदार प्रतिसाद देणार नाही, असेही सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : धामणगाव येथे नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

Jalgaon Crime : जळगावमध्ये 'गँगवार', राज शाळेजवळ तरुणावर कोयता, चॉपरने हल्ला

SCROLL FOR NEXT