Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

'सवाल ही पैदा नहीं होता..', कोल्हापुरात कोणी आम्हाला रोखू शकत नाही

बाळकृष्ण मधाळे

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या आज मंगळवारी (ता. 28) कोल्हापुरात येणार आहेत.

सातारा : आई आंबेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. सिध्दी विनायकानं आशीर्वाद दिले, की सगळी 'विघ्न' दूर होतील आणि तशी मला खात्री आहे. आज कोल्हापूरला आंबे माताचं दर्शन घेऊन मुरगूड (ता. कागल) पोलिस ठाण्यात (Murgud Police Station) मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) घोटाळ्याची तक्रार करणार आहे. त्यामुळे लगेचच हसन मुश्रीफांचे घोटाळे बाहेर येऊन कारवाई सुरु होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी व्यक्त केला. तद्नंतर त्यांनी, सवाल ही पैदा नहीं होता.. म्हणत, कोणी आम्हाला रोखू शकत नाही. आता घोटाळामुक्त महाराष्ट्र करुनच आम्ही थांबणार आहोत, असा गर्भित इशाराही सोमय्यांनी मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास साताऱ्यातून दिला.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या आज मंगळवारी (ता. 28) कोल्हापुरात येणार आहेत. सकाळी अकरा वाजता अंबाबाईचं दर्शन घेऊन ते मुरूगूड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी जातील. दिवसभर ते पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले असून याबाबतचे पुरावे सक्तवसुली संचलनालयाकडे (इडी) दिले आहेत. याबाबत मुरूगूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ते 19 सप्टेंबरला कोल्हापुरात येणार होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षाकारणास्तव त्यांना त्या दिवसासाठी जिल्हाबंदी केली होती. मात्र, आज ते पुन्हा कोल्हापुरात दाखल होऊन हसन मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढण्याचा चंग बांधला आहे. तसा त्यांनी साताऱ्यातून इशाराही दिला आहे.

किरीट सोमय्यांना कोल्हापुरात नो एन्ट्री?

मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार होते. मात्र, सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आल्याने त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. या नोटिशीनंतर माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यात ठाकरे सरकारकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप खुद्द सोमय्या यांनी केला होता.

मुश्रीफांच्या घोटाळ्याचे पुरावे माझ्या हातात : सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपनी असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar LPG Link : आधार-LPG लिंक नाही? तर सबसिडी बंद होणार! सरकारचा इशारा; आजच घरबसल्या 'असे' करा लिंक

Igatpuri Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! नराधम शिक्षकाचा चिमुकलीवर ८ महिने अत्याचार; घोटी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक एकत्र कोकण भवनला जाणार

Shiv–Shahu Vikas Aghad : पराभवातून बोध घेणार का? शिव–शाहू आघाडीपुढे मोठे आव्हान

जय शाह यांनी डोळे वटारताच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची भाषा बदलली; बांगलादेशला जाहीर सपोर्ट करणारे आता कोपऱ्यात जाऊन बसले, म्हणतात...

SCROLL FOR NEXT