kirit somaiya 
महाराष्ट्र बातम्या

मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश: किरीट सोमय्या

विनायक होगाडे

मुंबई: किरीट सोमय्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढल्यामुळेच माझ्या अटकेचे आदेश ठाकरे सरकारने दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. हा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे हे आदेश गृहमंत्र्यांकडून दिले गेल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या घराखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूरात येण्यापासून प्रतिबंधित करणारी नोटीस दिली आहे. त्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी आरोप करताना त्यांनी म्हटलंय की, मी अजून कोल्हापूरात गेलोच नाहीये. तर मला माझ्या घरात घुसून तुम्ही नोटीस देऊच कशी शकता? ठाकरे-पवार एवढे घाबरले आहेत का? जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिलीय की, किरीट सोमय्यांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यापासून प्रतिबंध आहे. 100 हून अधिक पोलिस माझ्या घराबाहेर दुपारी बारा वाजल्यापासून आले आहेत. मुश्रिफांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी मी कोल्हापूरला दौरा करणार होतो. मात्र, पवार एवढे घाबरले आहेत की, त्यांनी माझ्या अटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, मी कोल्हापूर दौऱ्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलिसांची गुंडगिरी ही ठाकरे सरकारची दादागिरी आहे. पोलिसांनी आतून मला आदेश दाखवलाय की, कोल्हापूर कलेक्टरांनी हा आदेश दिलाय की, ते कोल्हापूरला येता कामा नयेत. याचसाठी गृहमंत्र्यांनी हा आदेश दिलाय की, कोल्हापूरला येऊ नयेत. कारण ते आले तर ते हा घोटाळा बाहेर काढतील आणि अनिल देशमुखांनंतर त्यांनाही चौकशीचा ससेमिरा लागून जेलमध्ये जावं लागणार.

पुढे ते म्हणाले की, हसन मुश्रीफांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्यांचे तीन घोटाळे माझ्या हातात आहेत. सरकार घाबरले आहे. म्हणूनच ते माझी अटक करत आहेत. पण ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांना आम्ही जेलमध्ये पाठवूच.

मी आता उद्या सकाळी कोल्हापूरला जाईन. अंबेमातेचं दर्शन घेऊन कागलला कारखान्यात जाऊन घोटाळा बाहेर काढीनच. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही.

याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय की, ठाकरे सरकारची गुंडगिरी सुरु आहे. पोलीसांकरवी दमन शाही सुरु आहे. माझा घराखाली पोलिसांची गर्दी आहे. माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी मला मुलुंडच्या माझा घरातून अटक करण्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांनी आदेश दिला आहे. मी मुलुंड निलम नगर येथून ५.३० ला निघणार आहे. आधी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT