Rashmi Barve esakal
महाराष्ट्र बातम्या

Rashmi Barve: काँग्रेसला मोठा धक्का! रश्मी बर्वेंची निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती कोर्टाने फेटाळली!

Rashmi Barve: काँग्रेसने रश्मी बर्वे यांना रामटेक मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांना आता निवडणूक लढवता येणान नाही.

Sandip Kapde

Rashmi Barve:

रश्मी बर्वे यांच्या विरोधात दिलेल्या जात पडताळणी समितीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे रश्मी बर्वे यांना शेवटच्या घटकेला दिलासा मिळाला असला तरीही निवडणूक लढू देण्याबाबतची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज निवडणूक आयोगाने खारीज केल्याप्रकरणी न्यायालयाने कुठल्याही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

याप्रकरणी नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होईल विशेष म्हणजे तोवर रामटेक लोकसभा मतदारसंघासाठीचा मतदान पार पडलेला असेल. त्यामुळे रश्मी बर्वे यांना निवडणूक लढवता येणार नाही.

जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी खारीज केल्याप्रकरणी त्यांना दिलासा मिळालेला नाही.

रामटेक लोकसभा जागा ही SC राखीव जागा आहे. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना येथून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर रश्मी बर्वे यांनी बुधवारीच उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर वैशाली देविया यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जात प्रमाणपत्र तपासणी समितीने ते बेकायदेशीर ठरवले आहे. यानंतर रश्मी बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी विविध पक्षांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता.

रामटेकच्या उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसनेही डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव लिहिले होते. जात प्रमाणपत्रावरील आक्षेपामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्यास रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे पर्यायी उमेदवार म्हणून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT