Nagpur Graduate Constituency Election Gangadhar Nakade esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur MLC : 'आमचा हिरमोड नक्कीच झाला...'गंगाधर नाकाडे उद्धव ठाकरेंवर नाराज?

पदवीधरमतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण...

सकाळ डिजिटल टीम

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल गेला होता. पण काही वेगवान घडामोडींनंतर त्यांना अर्ज माघारी घ्यावा लागला. मातोश्रीवरून कॉल आल्यानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी हा निर्णय घेतला. तर अखेरच्या क्षणी नेमकं घडली तर काय? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. (Nagpur Graduate Constituency Election Gangadhar Nakade ShivSena Uddhav Thackeray maharashtra politics)

गंगाधर नाकाडे यांनी सहा महिन्यांपासून तयारी केली होती. पण आता शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याची वेळ ३ वाजेपर्यंत पर्यंत होती. शिवसेना भवनातून आदेश नाकाडे यांना अडीच वाजण्याच्या सुमारास आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे गंगाधर नाकाडे यांची चांगलीच धावपळ झाली. ते अखेरच्या क्षणी अक्षरशः सिग्नल तोडून विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले आणि अगदी धावत पळत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक सेनेचा मी विभागीय अध्यक्ष आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष अभ्यंकर यांचा मला कॉल आला होता. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम आम्ही आता करू. या घडामोडींमुळे आमचा हिरमोड नक्कीच झाला आहे, अशी प्रतिक्रिया नाकाडे यांनी अर्ज मागे घेतल्यावर दिली.

तसेच, गेल्या पाच वर्षांत आम्ही शिक्षकांसाठी भरपूर काम केले. कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले होते. संघटना चांगल्या पद्धतीने बांधली होती. ही जागा लढलो असतो, तर सर्वाधिक जास्त मतांनी ही जागा निवडून आली असती. पण श्रेष्ठी जो निर्णय घेतात, तो योग्य असतो. महाविकास आघाडीचा उमेदवार असो किंवा अन्य कुणीही, जे पक्षश्रेष्ठी सांगतील, त्या उमेदवाराचे काम करणार असल्याचेही गंगाधर नाकाडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Fine: वाहतूक दंडाचा मोठा डोंगर, वसूल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान; थक्क करणारी आकडेवारी समोर

T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...

Pune Police: पुण्यात दुचाकीस्वारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई; चौका-चौकात उभे आहेत पोलिस

Finance Ministry Jobs 2026: खुशखबर! वित्त मंत्रालयाकडून रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कंत्राटी भरती जाहीर, पाहा कोण अर्ज करू शकतात?

Khamgaon Jalna Railway: खामगाव-जालना रेल्वे मार्ग कागदावरच; पुन्हा हुलकावणी महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरतोय दिवास्वप्न

SCROLL FOR NEXT