Schools in the state are reluctant to register for RTE admission 
महाराष्ट्र बातम्या

आरटीई प्रवेश नोंदणीसाठी राज्यातील शाळा निरुत्साही; नोंदणीकडे फिरवली पाठ

सकाळ डिजिटल टीम

नंदोरी (जि. वर्धा) : वंचित व आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५ टक्‍के राखीव कोट्यातून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. शाळा नोंदणीसाठी २१ ते ३० जानेवारीपर्यंत मुदत होती. परंतु, या कालावधीत राज्यातील केवळ १४९५ तर नागपूर विभागातील २५१ शाळांनी नोंदणी केली आहे. विशेषतः नागपूर विभागातील गडचिरोली तर औरंगाबाद विभागातील जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही शाळेने नोंदणी केली नाही.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर पडली होती. यंदाही आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक विस्कटणार हे निश्‍चित. शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील आर्थिक व दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागा ठेवण्यात येतात. राखीव कोट्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे आरटीई प्रवेशाकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

या प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी होणे आवश्‍यक आहे. असे असले तरी यंदा राज्यातील शाळांचा नोंदणीसाठी निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागातील गडचिरोली व औरंगाबाद विभागातील जालना, उस्मानाबाद जिल्ह्यातील एकाही शाळेने आरटीई प्रवेशाकरिता नोंदणी केली नाही. आरटीई प्रवेश नोंदणीकरिता राज्यातील केवळ १४९५ शाळांनी नोंदणी केली असून १६ हजार ९०८ जागा आहेत. 

नागपूर विभाग 

जिल्हा शाळा नोंदणी आरटीई जागा
भंडारा १४ १४७
चंद्रपूर ७५ ६८८
गोंदिया ९३ ५८९
गडचिरोली ०० ०० 
नागपूर ४१ ३६९ 
वर्धा २८ २९३ 
एकूण २५१ २०८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT