Nagpur should be The Exports Hub 
महाराष्ट्र बातम्या

निर्यातीबाबत नितीन गडकरी काय म्हणतात... वाचा सविस्तर 

राजेश रामपूरकर

नागपूर :  देशाच्या हृदयस्थानी असल्याने नागपूर शहराच्या चारही दिशांनी ट्रक ट्रान्सपोर्ट टर्मिनल उभारण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. मोठे गोडावून शहराच्या चारही बाजूने उभारण्यात आल्यास नागपूर हे विविध उत्पादनांचे आणि निर्यातीचे मोठे केंद्र होईल. येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. 

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना दे बोलत होतो. यात नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे अध्यक्ष बी.सी. भरतीया, कॅमेटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, माजी अध्यक्ष हेमंत गांधी, उपाध्यक्ष अर्जुनदास आहूजा, संजय अग्रवाल, रामअवतार तोतला, सचिन पुनियानी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, उद्योजक व व्यापाऱ्यांना एमएसएमईचे लाभ मिळावेत यासाठी मी सकारात्मक आहे. विविध उद्योजक आणि व्यापाऱ्यांना एमएसएमईत आणण्याचा प्रयत्न आहे.

नागपूर शहराबाहेर रिंगरोडवर सर्व व्यापारी आणि उद्योजकांसाठी गोडावून बनवावे. यासाठी चेंबरने पुढाकार घ्यावा. शहराच्या चारही दिशांना ट्रक ट्रान्सपोर्ट टर्मिनलची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्ध करता येईल. गोडावून बांधल्यानंतर ट्रान्सपोर्ट शहराबाहेर जाईल आणि प्रदूषणही कमी होईल. होलसेल किराणा व्यापाऱ्यांसाठी कळमन्यात जागा आहे. तेथे बहुमजली मार्केट उभे करता येईल. २५ वर्षानंतरचे नागपूर व्यापारी उद्योगाच्या दृष्टीने कसे असेल याचे डिझाईन तयार करावे. यातून रोजगार निर्माण होतील, पर्यटकांची संख्याही वाढेल. कोरोना काळात चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी गरिबांच्या पाठीशी मदतीसाठी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

अजनी  मल्टिमॉडल  हब 

अजनी रेल्वे स्टेशन हे  मल्टिमॉडल हब बनविले जात असून यासाठी ९०० कोटी खर्च केले जाणार आहे. अमेरिकेच्या आर्किटेक्टने हे डिझाईन बनवले आहे. एकाच ठिकाणाहून अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच बडनेरा गोंदिया, गोंदिया चंद्रपूर, रामटेक नरखेड, नरखेड वडसा, बडनेरा छिंदवाडा ही ब्रॉडगेज मेट्रो सुरू होणार आहे. या मुळे नागपूरचे महत्त्व वाढणार असल्याचेही गडकरी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT