maharashtra winter session 2022 devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

CIBIL Score : शेतकऱ्यांना 'सिबिल' विचारलं तर याद राखा; विधानसभेत फडणवीस म्हणाले...

संतोष कानडे

नागपूरः विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु आहे. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना छळणाऱ्या बँकांना इशारा दिला आहे.

CIBIL Score For Farmers

परवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले होते. त्याला आज फडणवीसांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, ' दादांनी अनेक विषयावर चर्चा केली होती. एका गोष्टीचं दुख: आहे की संधी मिळाली असताना पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. 2004 ला संधी होती.

तुमचे जास्त नेते निवडून आले होते. तुमच्या काराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते त्याचा मुख्यमंत्री झाला असता तरीही तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली नाही, असा टोला अजित पवार यांना फडणवीस यांनी लगावला आहे.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

शेतकऱ्यांविषयी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेने सिबिल cibil विचारु नये, मग ती बँक खाजगी असो की राष्ट्रीयकृत. सिबिलचा मुद्दा कोणी उपस्थित केला आणि तक्रार आली तर नक्की कारवाई करु, असं ते म्हणाले.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

फडणवीस पुढे म्हणाले की, विदर्भातल्या बँका बंद पडल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला असला तरी त्या तीन बँका त्यांच्याच हातात होत्या. विरोधकांचं सरकार असतांना विदर्भातील बँका कमजोर करण्याचं काम त्यांनी केलं. आम्ही त्या बँका पुरुर्जीवित करण्यासाठी ५०० कोटी दिले परंतु बँकांची अर्थस्थिती सुधारली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT