Hingoli News esakal
महाराष्ट्र बातम्या

घरचं सोनं मोडून टोपलीभर पैसा उधळला; तरुण शेतकऱ्याचा कृषी कार्यालयात संताप

संतोष कानडे

हिंगोलीः ३१ मार्च रोजी मराठवाड्यातल्या पैठण पंचायत समितीसमोर एका सरपंचाने पैसे उधळले होते. बीडीओंवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन सरपंचाने खळबळ उडवून दिली होती. आज पुन्हा मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातील कृषी कार्यालयामध्ये असाच प्रकार घडला आहे.

नामदेव पतंगे या तरुणाने घरातील दागिने मोडून त्या पैशांची कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये उधळण केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस खतांचं प्रकरण गाजत आहे. तक्रार करुनही कृषी कार्यालय अशा कंपन्यांवर कारवाई करत नाही. त्यामुळे संतापलेल्या तरुण शेतकऱ्याने सोनं मोडून मिळवलेले टोपलीभर पैसे उधळले.

बोगस निविष्ठा विक्री करत असलेल्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नामदेव पतंगे यांनी १९ मे रोजी केली होती. मात्र कृषी कार्यालयाने त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं. शेवटी आज सकाळी त्यांनी टोपलं भरुन नोटांचे बंडल हिंगोली कृषी अधीक्षक कार्यालयात आणले आणि उधळून दिले.

हिंगोलीसह राज्यभरात विषारी रसायन मिसळून खतांची विक्री केली जाते. मात्र अधिकारी जाणीवपूर्वक या कंपन्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोलीचे पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांनी या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी नामदेव पतंगे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर एका तरुण सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला होता.

याचा व्हीडिओ त्याच दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी राज्यभर व्हायरल झाला. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, विहिरींना मंजुऱ्या न देणे यामुळे वैतागलेल्या मंगेश साबळे यांनी दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

Constitution Day: संविधान दिन विशेष मूळ संविधानाची प्रत, दुर्मिळ ग्रंथ, बाबासाहेबांच्या नोट्स ‘सिद्धार्थ’ने जपल्या खाणाखुणा

Latest Marathi News Live Update :पुण्यात कोयता गँगची काढली पोलिसांनी धिंड

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा धागा बिहारपर्यंत; कोल्हापूर कनेक्शन उघड, पोलिसांच्या मौनामुळे संशय अधिक गडद!

CM Yogi Adityanath: मोबाईलवर दिसणार आपले शेत आणि घर! योगी सरकार नागरिकांना देणार मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT