Nana Patole Agitation Live Updates
Nana Patole Agitation Live Updates टिम ई सकाळ
महाराष्ट्र

PM मोदींनी नाही, काँग्रेसनं देशाची माफी मागावी - फडणवीस

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना पसरण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आज आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं होतं. तर आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आज फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस कार्यकर्ते येण्यापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. (Nana Patole Agitation Live Updates)

भाजप आमदार आशिष शेलार हे सध्या मलबार हिल पोलीस स्टेशनच्या बाहेर पोहोचले आहेत. यावेळी आशिष शेलार यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी पोलीस झुंडशाही करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. तसंच काँग्रेसने घाबरून हे आंदोलन मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांनी गर्दी केली असून, तिथे बैठक पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा सवालच नाही असं म्हटलं आहे. तसंच हे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता दक्षिण मुंबईत वाहतुकीस अडथळा नको म्हणून काँग्रेस हे आंदोलन थांबवत असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल.

काँग्रेसच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, या सरकारला फक्त भ्रष्टचार करायचा आहे. समोर आले तर नक्कीच 'इटका जवाब पथ्थरसे' देऊ असं आवाहन मनिषा चौधरी यांनी नाना पटोलेंना दिलं आहे.

दक्षिण मुंबईमध्ये या आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आता आंदोलनस्थळी जाण्यासाठी निघाले असून, काही वारकऱ्यांनी देखील गर्दी केल्याचं दिसून आलं.

नाना पटोले हे पायी फडणवीसांच्या घराकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. यावेळी आम्ही गनिमी कावा करुन फडणवीसांच्या बंगल्यावर आम्ही पोहोचू असं नाना पटोले म्हणाले.

ज्ञानोबा, तुकोबांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची पंतप्रधान मोदींनी बदनामी केली, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचं वारकऱ्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते देखील जमा झाले आहेत. त्यावेळी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना देखील रोखलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT