Nana Patole And PM Modi  e sakal
महाराष्ट्र बातम्या

पटोलेंना मोदींबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य भोवणार?

भाजपच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुधीर काकडे

भाजपच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून काही दिवसांपूर्वी एक मोठा वाद उभा राहिला होता. पटोले यांनी 'मोदी' हे नाव संबोधून केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याचवेळी मुंबई भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर त्यांना मिळालेल्या उत्तराच्या पत्राला आज लोढा यांनी आपल्या ट्विटवरून शेअर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत लोढा यांनी ही मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाने उत्तर दिलं आहे. तुमचं पत्र आम्हाला मिळालं असून, योग्य ती कारवाई करण्यासाठी ही माहिती पोलिसांकडे देण्यात आल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आता नाना पटोलेंची चौकशी होणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी आपण हे वक्तव्य गावातील एका गुंडासाठी केलं असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार पुढे भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ऍड. सतीश उके यांनी केला होता. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे उर्फ मोदी असं आहे असंही सांगण्यात आलं होतं. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT