Nana Patole on Mahavikas Aghadi e sakal
महाराष्ट्र बातम्या

'महाविकास आघाडीत सर्व पक्षांनी समन्वयानं वागण्याची भूमिका होती, मात्र...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज काँग्रेसमध्ये (Congress) मेगा भरती झाली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच मालेगावमध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेल्या कार्यकर्त्यांबाबत देखील पटोलेंनी प्रतिक्रिया दिली.

ही तर झाकी आहे. राज्यात महाविकास आघाडी पक्षाचे सरकार आहे. पण, पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येकालच आहे. मालेगाव, भिवंडीमध्ये जे झाले त्याचा राग आहे. पण द्वेष नाही. आम्ही कोणाला प्रलोभन देत नाही. कोणाशी स्पर्धा करत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी समन्वयाने वागावे. समन्वयाने चालावे ही भूमिका होती, मात्र एखाद्या मोठ्याने मोठ्या पद्धतीने राहिले तर सन्मान होतो. मोठाच जर थोडस चुकीचं करत असेल तर लहानही चुका करायला मोकळा असतो, हा संदेश या निमित्ताने आम्ही दिला आहे, असं नाना पटोले म्हणाले.

भाजपला सत्तेचा मानसिक रोग झाला आहे. पहाटेच सरकार गेलं तेव्हापासून भाजपचे मानसिक संतुलन बिघडले आहे. सतत असे वक्तव्य करून राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे. पंतप्रधानांसह त्यांचा एकही मंत्री गांधी कुटुंबीयांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. हे नेते आरएसएसमध्ये मोठे झाले आणि पदवार बसले आहेत. आरएसएसची ही संस्कृती आहे का? हिंदुस्थानची ही संस्कृती आहे का? असे सवाल उपस्थित करत नाना पटोलेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

कोरोना महाराष्ट्राने पसरवला, असे सांगत लोकसभेत महाराष्ट्रालाही पंतप्रधानांनी बदनाम केले.महाराष्ट्राची बदनामी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. काँग्रेसवर टीका करून हे सत्तेत आलेत. आजही तेच करत आहे. पण, दिलेल्या आश्वासनांचं काय? हे काँग्रेसमुक्त करू इच्छितात. मात्र, कधी जनता यांना भाजपमुक्त करेल हे यांना कळणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

SCROLL FOR NEXT