नाना पटोले Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील ७२ टक्के मुस्लीमांनी भोंग्याचे आवाज कमी केले : नाना पटोले

राज्यात आणि देशभरात सध्या मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरुन वाद सुरु आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात चाललेल्या भोंग्याच्या प्रकरणामुळे वाढलेल्या तणावामुळे आणि सदावर्ते यांच्या चाललेल्या अटकेबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबरोबर त्यांनी भाजपाच्या राजकारणावरही निशाना साधत टीका केली आहे.

राज्यात आणि देशभरात सध्या मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणावरुन वाद सुरु आहेत. भाजपाकडून केंद्रातील आपली खुर्ची वाचवण्यासाठी सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं नाना पटोले यांनी सांगितलं. केंद्रात सत्तेत असलेलं भाजपा सरकार गेल्या आठ वर्षात सपशेल अपयशी ठरलं आहे. ते आता आपली खुर्ची वाचवण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत.

राज्यातील ७२ टक्के मुस्लीम समाजाने भोंग्याचे आवाज कमी केले आहेत, काहींनी मशिदीवरील भोंगे खालीही उतरवले आहेत. राज्यातील हिंदू आणि मुस्लीम समाजातील भाईचारा संपू नये यासाठी मुस्लीम समाज पुढाकर घेत असेल तर हे गौरवास्पद आहे असं ते बोलताना म्हणाले.

गेल्या पाच महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आणि जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. भाजपाने पाच महिने हे आंदोलन तेवत ठेवलं, त्यांनी जनतेला त्रास दिल्याचा आरोप पटोलेंनी केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत, त्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आगामी निवडणूकांची तयारी सध्या सर्वजण करत आहेत. त्यामुळे कोण कुणाची पोलखोल करेल ते दिसेलंच, कारण जनता समजदार आहे. जनतेला सांगायची गरज पडत नाही, आगामी निवडणूकांमध्ये जनता भाजपाची पोलखोल करेल असं नाना पटोले यांनी बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT