Nana Patole and Narendra Modi Nana Patole and Narendra Modi
महाराष्ट्र बातम्या

काँग्रेसचे भाजपविरोधात 'माफी मांगो' आंदोलन; नाना पटोलेंची घोषणा

मोदींच्या या वक्तव्यामुळे देशभरासह राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई - देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांनी सोमवारी लोकसेभत केले होते. त्यानंतर देशभरातील आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत बुधवारपासून काँग्रेसतर्फे (Maharashtra Congress) भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर 'माफी मांगो' आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले. (Nana Patole Latest News In Marathi)

पटोले म्हणाले की, पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती देशाची असते, त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याने मनाला तीव्र दुःख झाल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदावर बसलेले व्यक्ती अजूनही भाजपची प्रचारक म्हणून वागत असल्याचे सांगत, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, भाजपने आणि पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली पाहिजे अशी मागणी पटोले यांनी यावेळी केली. देशाला दिशा देण्याबरोबरच देशाला मदत करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. (Congress Mafi Mango Protest )

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होते तेव्हा विरोधकांच्या आरोपांचे खंडन करून सरकारने काय केले हे सांगायचे असते. एकमेकांची खिल्ली उडवायची नसते. तातडीने लॉकडाऊन (Lockdown ) लावला तेव्हा हजारो लोकं चालत गेले, अनेकांचा जीव गेला. भाजपचे राज्यातील नेते समर्थन करत असतील तर ते महाराष्ट्र द्रोही असल्याचे पटोले म्हणाले. गुजरातमधून १ हजार ३३ श्रमिक ट्रेन सोडल्या तर महाराष्ट्रातून ८०० ट्रेन सोडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गुजरातमध्ये भूकंप आला तेव्हा महाराष्ट्राने सगळ्यात जास्त मदत केली. महाराष्ट्राने बाहेरून आलेल्या अनेकांना महाराष्ट्राने मोठं केले आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT