Nana Patole on Governor Bhagat Singh Koshyari e sakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यपाल आहेत म्हणून, दुसरं कोणी असतं तर...', पटोले आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

बुलडाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं होतं. त्यावरूनच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी बुलडाण्यातील ओबीसी संमेलनात बोलताना राज्यापालांबाबत एक वक्तव्य करत केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. राज्यपाल आहेत म्हणून, दुसरा कोणी असता तर हिसका दाखवला असता, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे.

राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज, आमची माता सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात वक्तव्य करतात आणि केंद्रातील भाजप सरकार बघ्याची भूमिका घेतेय. आता आपआपल्या विचार करावा लागेल. राज्यपाल आहेत म्हणून, दुसरा कोणी असता तर हिसका दाखवला असता, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. तसेच केंद्रातील भाजपला (BJP) चिंता असती तर त्यांनी त्वरीत राज्यपालांना माघारी बोलावलं असतं. पण, केंद्र सरकारने अजूनही भाज्यपालांना पदावर ठेवलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यपालांचं वक्तव्य काय? -

''समर्थ रामदासांच्या कृपेनं आम्हाला राज्य मिळालं असं शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं. त्याच बरोबर गुरुदक्षिणा म्हणून राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असंही समर्थ रामदासांना शिवरायांनी म्हटलं होतं. या देशात गुरूंची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला त्याला सर्वकाही मिळतं आणि सद्गुरू मिळाला नाहीतर काहीच मिळत नाही. समर्थांच्याशिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का?'' असा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून राज्यपालांचा निषेध नोंदवण्यात आला होता. याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील उमटले. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT