Nana Patole and Ashish Deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole : झाडे की आडबले? पाठिंबा देण्यावरून नाना पटोले- देशमुख आमने-सामने

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गोंधळ सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदरीवरून मोठा गोंधळ झाला होता. नागपूर येथील पदवीधर निवडणुकीतही असाच गोंधळ झाला आहे. त्यातच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अल्टीमेटम दिलं आहे. (Nana Patole news in Marathi)

उमेदवारीबाबतचा गोंधळ नाना पटोले यांच्यामुळे सुरू आहे. शिक्षक मतदार संघात सुधाकर आडबले यांना काँग्रेसच्या नेत्यांनी समर्थन दिलं, ते वैयक्तिक आहे. मात्र पदवीधर निवडणुकीत शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनी काँग्रेसला मदत केली होती. त्यामुळे त्यांना शिक्षक मतदारसंघात मदत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी वचन दिलं होतं. त्यामुळं आश्वासन पाळत आहोत, आणि राजेंद्र झाडे यांना समर्थन देतोय, असं आशिष देशमुख म्हणाले.

मी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा बोलणार की राजेंद्र झाडे यांना समर्थन द्यावं. नागपूर मतदारसंघात राजेंद्र झाडे हे विजयी होऊ शकणारे उमेदवार आहे, असं सांगतानाच देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांनी जे समर्थन जाहीर केलं, ते त्यांचं वैयक्तिक असून त्यांना समर्थन जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं.

दरम्यान प्रदेशाध्यक्षांनी आज राजेंद्र झाडे यांना महाविकास आघाडीचं समर्थन जाहीर करावं. अन्यथा प्रदेशाध्यक्ष पद सांभाळता येत नसेल त्यांना पदावरून हटवावं, असही देशमुख यांनी म्हटलं.

हेही वाचा दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT