udayanraje bhosale 
महाराष्ट्र बातम्या

‘राजेंचे वंशजच अनाजी पंतांना शरण गेले’

सकाळ डिजिटल टीम

नांदेड : साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. नांदेडमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातही विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

काय म्हणाले मुंडे?
राजे गेले, सेनापती गेले काही कावळेही गेले, अशा शब्दांत मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांचा समाचार घेतला. छत्रपतींच्या काळात स्वराज्यात फूट पाडण्याचे काम अनाजी पंतानी केले. आज राजेंचे वंशजच अनाजी पंतांना शरण गेले, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांच्यासह इतर विरोधी नेत्यांचाही समाचार घेतला. एकेकाळी रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, गवई यांना लक्ष्य करताना मुंडे म्हणाले, ‘प्रकाश आंबडेकर, आठवले, गवई यांना खुल्या मतदारसंघातून पवारसाहेबांनी निवडून आणले होते. आता ते विसरले आहेत.’ सरकारने निवडणुकीपूर्वी मेगाभरतीची घोषणा केली होती. पण, ती मेगा भरती नोकऱ्यांची नाही तर, पक्षातील मेगा भरती होती, अशा शब्दांत मुंडे यांनी भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशांची खिल्ली उडवली.

पाच उमेदवारांची केली घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेल्या काही दिवसांत अनेक नेत्यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्यात दौरा करत आहेत. तसेच जिल्हा निहाय राष्ट्रवादीच्या मतदारसंघांची तयारीही जाणून घेत आहेत. सध्या पवार मराठवाड्यात असून, त्यांनी काल (बुधवार, १८ सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणाही केली आहे. तेथे परळी विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन बहिण भावांमध्ये लढत रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT