Narayan Rane and Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : उद्धव ठाकरे महाफडतूस, कार्यशून्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून टीकास्त्र

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वादात ‘एन्ट्री’ करीत राणे यांनी ठाकरेंवर आगपाखड केली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वादात ‘एन्ट्री’ करीत राणे यांनी ठाकरेंवर आगपाखड केली.

मुंबई - शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाफडतूस, विक्षिप्त, दगेबाज आणि कार्यशून्य आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांच्यावर प्रहार करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांचा हिशेब चुकता केला. इडी, बिडी बोलू नका; नाही तर योग्य जागी जाल, असा इशारा त्यांनी ठाकरे यांना दिला.

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील वादात ‘एन्ट्री’ करीत राणे यांनी ठाकरेंवर आगपाखड केली. भाजपच्या मुंबई कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप, खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्या आरोपावरूनही राणे यांनी ठाकरेंना फटकारले.

राणे म्हणाले,‘‘युती सरकारच्या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री असताना ठाकरे यांनी त्यांच्याकडून कामे करून घेतली. केवळ शिव्या देण्याचे काम ठाकरे करीत आहेत. मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या व्यक्तीला अशी भाषा शोभत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांवर बोलणाऱ्या महिलेला समज देण्याऐवजी ठाकरे त्यांना भेटले. मी असतो तर महिलेला जाब विचारला असता. ठाण्यातील मोर्चाला कोणीही जुमानत नाही.’’ शिवसेनेच्या मुखपत्रावरही राणेंनी टीका केली. तसेच, मुखपत्राच्या आपल्याविरुद्धच्या भूमिकेबद्दल न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

युती नको म्हणून सांगितले होते

राज्यात विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपसोबत युती नसती तर शिवसेनेचे काही आमदार निवडून आले नसते.त्यामुळे पुढे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करू नये, असे मीच फडणवीस यांना सांगितले होते. ठाकरे यांचे सारे संपले असल्याने आता युतीचा उपयोग होणार नसल्याचे तेव्हा मी सांगितले होते, असा दावा राणे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरात भाजपच्या दाव्यांना बंडखोरीचे ग्रहण; काँग्रेसचीही खास रणनीती, मनपात कुणाची येईल सत्ता?

सीन शूट करताना जितेंद्र जोशीला खरोखरच फास लागला ! अभिनेत्याने सांगितली भयानक आठवण, म्हणाला..

SCROLL FOR NEXT