narayan rane on eknath shinde
narayan rane on eknath shinde  
महाराष्ट्र

राणे म्हणाले, शाब्बास! एकनाथजी... नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता

सकाळ डिजिटल टीम

नारायण राणे म्हणतात, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात

काल विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं दिसतं असून शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. आता यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. (narayan rane on eknath shinde)

शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, नाही तर लवकरच तुझाही आनंद दिघे झाला असता, असा उपरोधिक टोला मंत्री राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. यावर आता शिवसेना कोणतमी भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. याआधीही ठाकरे आणि राणे यांच्यातील राजकीय वाज चव्हाट्यावर आले आहेत. मात्र आता या वादात राणेंनी उडी घेतल्याने पुढील राजकीय खेळी काय असणार आहे यावर चर्चांना उधाण आलं आहे.

https://twitter.com/MeNarayanRane/status/1539125628942827523?s=20&t=Elhk_NEAV0eiVOtz36k0mgदरम्यान, विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व काही आमदार नॉट रिचेबल असल्याने राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप दुपारी दोन नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT