sakal
महाराष्ट्र बातम्या

"केंद्रीय मंत्री सांगूनही पोलीस सोडत नव्हते, मग अमित शहांना फोन केला"

नारायण राणे आणि नितेश राणे यांची दुपारी २ पासून मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी सुरु होती.

सुधीर काकडे

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. राणे पिता पुत्रांना तब्बल 9 तास चौकशीसाठी थांबवण्यात आलं. त्यानंतर आता ते साडेदहा वाजेच्या सुमारास ते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले आहेत. राणे पिता-पुत्र आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समर्थकांसह मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. दरम्यान, मालवणी पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरु केला आहे. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला.

दिशा सालियान प्रकरणावर आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस ठाण्यात यावं अशी नोटीस पोलिसांनी दिली होती. आम्ही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या आहे. तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी. मात्र महापौर पेडणेकर तिच्या आई वडीलांकडे गेले. त्यानंतर त्यांनी दिशाच्या आई वडीलांना तक्रार द्यालया प्रवृत्त केलं. दिशाची आई म्हणते राणे पिता पुत्रांमुळे आपली बदनामी होतेय. ही खोटी तक्रार पोलीसांनी घेतली आणि आम्हाला नोटीस दिली. आमची ९ तास चौकशी झाली. आम्ही सांगत होतो की, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार आहे मात्र तरी पोलीस सोडत नव्हते. त्यानंतर आम्ही अमित शहांना फोन केला. त्यानंतर आमचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडलं. दिशा सालियानच्या हत्येबद्दल जिथे आवाज उठवता येईल तिथे उठवण्याचा प्रयत्न करु असं राणे म्हणाले.

"तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले होते..."

"सुशांत आणि दिशाची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोन वेळा फोन आला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, या प्रकरणात एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका, तुम्हालाही मुलं आहे. मात्र माझ्या स्टेटमेंटमधून हे वाक्य वगळलं आहे. त्यामुळे आजही ही कारवाई राजकीय हेतूनं केली" असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

काय म्हणाले होते राणे?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियानची आत्महत्या नव्हे तर हत्याचा झाल्याचा आरोप करताना आक्षेपार्ह आरोप राणेंनी केले होते. त्यानंतर दिशाचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून दिशाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महिला आयोगानं पोलिसांनी या प्रकरणी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: भूसंपादनासाठी आठवडाभरात अधिसूचना; शक्तिपीठ महामार्ग, प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार, शेतकऱ्यांचा विरोध कायम

Latest Marathi News Live Update : अनुदानित खतांची विक्री आजपासून बंद

Jalgaon farmer: बापाची हृदयद्रावक धडपड! शेती वाचवण्यासाठी दोन मुलांना औताला जुंपून पाडल्या सरी, जळगाव जिल्ह्यात कुटुंबाची पोटासाठी धडपड..

Mahua Barfi : घरच्या घरी कशी बनवायची हमीरपूर स्टाईल 'महुआ बर्फी'? पाहा साहित्य आणि बनवण्याची संपूर्ण सोपी विधी!

El Nino 2026 : चिंता वाढली! प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय; पावसावर आणि शेतीवर होणार मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT