narayan rane attack on cm uddhav thackeray after ed action against kin shridhar patankar  
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : उद्धव जगातला सर्वात 'ढ' माणूस; केंद्रीयमंत्री राणेंची संतप्त टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भाजपवर कडाडून टीका केली. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव यांनी भाजप फटकारलं. यावेळी त्यांनी भाजपच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली. याला आज भाजपकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. (Narayan Rane news in Marathi)

नारायण राणे म्हणाले की, उद्धव म्हणतात मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत. अरे केंद्रीयमंत्री आहेत ते. देश सांभाळतात. त्यांना अस कसकाय म्हणू शकतात. गिधाडं म्हणणं चुकीचं आहे. असं बोलल्यामुळे जेलमध्ये जाल. तुम्ही तर लबाड लांडगे आहेत, असंही राणे यांनी म्हटलं. लबाड लांडगे भरोसा ठेवण्याच्या लाईक नाहीत, त्यामुळे तुम्हाला लांडगा म्हणतोय, असंही राणे यांनी नमूद केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला. केंद्र सरकार नेहमीच मुंबईला मदत करतं, यांना महित नाही. कधी वाचत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी कधी वाचला नाही. यांना कस कळणार, केंद्र सरकारने मुंबईसाठी काय दिलं. उद्धव ठाकरे हा जगातील सर्वात 'ढ' माणूस आहे, असा सवालही राणे यांनी केला.

उद्धव म्हणाले होते, मुंबईवर गिधाडे घिरट्या घालत आहेत. हे काय नवीन नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून मोठे झालो आहोत. स्वराज्यावर ज्यांनी चाल केली त्यांना धडा शिकवला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री मुंबईत आले. आणि म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही, शिवसेना तलवारीचं पातं आहे. तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT