bjp narayan rane aditya thackeray shiv sena esakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane : ''संजय दत्त बॅग घेऊन 'मातोश्री'त आला होता...'' नारायण राणेंनी काढला इतिहास

संतोष कानडे

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्र सोडलं. शिवसेनेचा इतिहास सांगताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईत पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

'शिवसेना लोकाधिकार आणि मी' या खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. मुंबईतल्या सहारा हॉटेल येथे हा कार्यक्रम झाला.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, या पुस्तकामध्ये ५७ वर्षांचा शिवसेनेचा इतिहास लिहिला आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी हे जरुर वाचावं. माझाही पुस्तकात उल्लेख केला असून आम्ही सुरुवातीपासूनच शिवसेनेते होतो. शिवसेनेत आलो तेव्हा मी १५ वर्षाचा होतो. दुसऱ्या मुलाला पुढे करत त्याचं नाव नारायण राणे सांगून मी शिवसैनिक झालो, कारण मी लहान होतो अन् हाईट पण कमी होती.

राणे पुढे म्हणाले की, मी १८ वर्षे क्रॉस केल्यानंतर मला आयकर विभागात नोकरी मिळाली. शिवसेना जन्माला आली तेव्हा उद्धव ठाकरे ८ वर्षांचे होते. तेव्हा रुमाल पण सोबत नव्हता त्यांच्या. कोणी एकाने सांगवं की, त्यांनी कोणत्या आंदोलनात भाग घेतला.. कधी शिवसेना जिंदाबाद असं तरी म्हटलंय का? उच्चार बरोबर येईल की नाही, याची भीती वाटत असेल.

उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना राणे पुढे म्हणाले की, ते सध्या खोक्यांचे आरोप करत आहेत. परंतु माझ्याकडे पुराव्या सकट १०५ प्रकरणं आहेत. जी माणसं मातोश्रीवर पैसे घेऊन गेले त्यांची माहिती आहे. काही माणसं आता पण इथे आहेत. आता कोरोना काळात औषधांवर १५ टक्के कमिशन कोणी घेतले? सांगा नाहीतर मी सांगतो. संजय दत्त पण तेव्हा मातोश्रीवर बॅग ओढत घेऊन गेला होता. संजय दत्त कसा आला? बॅग घेऊन.. गेटपासून बॅग ओढत ओढत घेऊन गेला ना? कोणत्या गेट मधून आला ते पण सांगू का?

राणे पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदेनी ४० आमदार पिकनिकला नेले, पण तुम्हाला सांभाळता आले नाहीत. खोक्यांचे आरोप काय करता? आता एअर इंडियाबद्दल पण सांगतो. पावसकर सांगा, त्या उध्दव ठाकरेंना किती मिळायचे? एअर इंडियाचा मॅनेजर हरिहरन महिना 25 लाख द्यायचा उध्दव ठाकरेंना. लावा माझी चौकशी मी देतो उत्तर.

असे गंभीर आरोप करत राणे पुढे बोलले की, एकनाथ शिंदेंना विनंती आहे की, जालन्यामध्ये जे झालं त्यात लक्ष द्या. मराठा समाज 34 टक्के आहे, कोणत्याही जातीचा अंत पाहू नका.. लक्ष द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT