Narayan Rane  sakal media
महाराष्ट्र बातम्या

मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. तसेच सुशांतसिंह प्रकरणाची फाईल देखील पुन्हा ओपन होणार असल्याचा त्यांनी दावा केला आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. (Narayan Rane)

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल. एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी म्हटलंय की, विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार? असा सवालही त्यांनी केला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांची ईडीनं चौकशी सुरु केल्यानं घाबरून जाऊन ते भाजपला सरेंडर झाले, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला आहे. मुंबईत नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला, त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि राणेंवर पलटवार केला होता. त्या पार्श्वभूमीवर आता नारायण राणे यांनी हे ट्विट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT