नारायण राणे sakal
महाराष्ट्र बातम्या

महाविकास आघाडी बुडणारी टायटॅनिक : नारायण राणे

भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार नाही.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आमची बोट एकदम सुरक्षीत असून, इथून सुटली की सुरक्षितपणे थेट दिल्लीत थेट जाते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही बुडणारी टायटॅनिक आहे. या जहाजाला प्रत्येकजण आपापल्या बाजूने खेचत असल्याने या बुडणाऱ्या जहाजात कोणी बसणार नाही. तसेच शिवसेनेचे आता १० नगरसेवक आहेत, ते शून्य होतील, अशी टीका केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपतर्फे अटलशक्ती महासंपर्क अभियानाच्या बैठकीनंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नारायण राणे म्हणाले, ‘‘ अटल शक्ती अभियानाच्या माध्यमातून पुणे महापालिकेत आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळावी यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ९८ नगरसेवक आहेत, यावेळी १०० पेक्षा जास्त जागा याव्यात म्हणून कार्यकर्त्यांनी लोकांना भेटून आपण सत्ताधारी म्हणून कशा पद्धतीने काम केले आहे हे सांगण्यासाठी हे अभियान आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

पुणे महापालिकेत शिवसेनेचे सध्या १० नगरसेवक आहे, पण ते आता शून्य कसे होतील हेच आमचे लक्ष आहे. शिवसेनेचे नेत मनाला येईल तसे काही बोलत असतात. महापालिकेत सत्ता येणार तर किती संख्या फुगवणार?. संसदेत भाजपचे ३०३ खासदार आहे, त्यामळे शिवसेना युपीएमध्ये जाऊन काय होणार? शिवसेना ही हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी करून सत्ता मिळवली. मग शिवसेना आता युपीएशी जवळीक साधून अजून वेगळे काय करणार आहे, अशी टीका राणे यांनी केली.

राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे यासाठी निर्बंध लादले लागते आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असून, आत्ताच निर्बंध घालू नये.

आता मागे का फिरता

आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा सरकार नव्हते त्यावेळी सत्तेत आल्यावर तुमचा सातबारा कोरा करू, वीज फुकट देऊ, हेक्टरी ५० हजार रुपये देऊ असे सांगत होते. मग आता सत्ता असताना आश्वासनापासून मागे का फिरता?, असा प्रश्‍न राणे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT