narayan rane sakal
महाराष्ट्र बातम्या

Narayan Rane: शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? असं विचारणाऱ्या राणेंचं घुमजाव; म्हणाले, वेगळाच...

विधीवत कार्यक्रम होत नसल्याचं सांगत शंकराचार्यंनी राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालणाऱ्या पुरीच्या शंकराचार्यांवर टीका करताना त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. पण यावरुन टीका व्हायला लागल्यानंतर आता त्यांनी यावरुन घुमजाव केलं आहे. आपण असं बोललोच नाही, पत्रकारांनी वेगळाच अर्थ काढल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (narayan rane take uturn on his own statement on shankaracharya)

जे कोणी केलं नाही ते मोदींनी केलं

भाजपच्या एका कार्यक्रमात यावर स्पष्टीकरण देताना नारायण राणे म्हणाले, "पत्रकारांशी बोलताना त्यांनी विचारलं की चार साधू असं म्हणाले, त्यावर मी म्हटलं ते म्हणाले मोदींवर टीका केली. पण जे कोणी केलं नाही ते मोदींनी केलं ना. राम मंदिर बांधलं आत्तापर्यंत कोणीनाही बांधलं. ते अपुरं आहे होईल ना योग्यवेळी. पण रामाची तर साधना होईल ना" (Marathi Tajya Batmya)

पण पत्रकारांनीच तसं चालवलं

मग त्यावरुन टीका करु नका असं मी बोललो पण पत्रकारांनी लावलं की ते असे बोलले तसे बोलले आणि आता यावरुन वाद होणार. राणे वादाला कधीच घाबरत नाही. मी तुम्हाला सांगतो मी एवढी वर्षे राजकारणात आहे ५० वर्षांहून अधिक काळापासून, वादातूनचं मी इथवर पोहोचलो आहे, असंही यावेळी नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

राणे शंकराचार्यांवर काय म्हणाले होते?

माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, "शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी. म्हणजे हे शंकराचार्य आमच्या भाजपला मोदी साहेबांना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. हे सर्व राजकीयदृष्टीकोनातून नव्हे तर राम आमचा देव आणि दैवत आहे त्यासाठी हे सर्व केलं जात आहे, मंदिर तयार होत आहे.

रामाची मूर्ती तिथं जागेवर येतं आहे, आम्हाला त्याच्यापुढं नतमस्तक होता येत आहे याचं आम्हाला समाधान आहे. त्यामुळं शंकराचार्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्यांनी जीवनात हिंदु धर्मासाठी काय योगदान दिलं? हे त्यांनी सांगावं. जे योगदान हिंदु धर्मासाठी रामानं दिलं, ते त्यांनी दिलं आहे का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT