narendra joshi Apologize for uday samant death threat in nana patole meeting nanar refinery  
महाराष्ट्र बातम्या

सामंतांना जाळून टाकू म्हणणाऱ्या कार्यकर्त्याने मागितली माफी; म्हणे, आम्ही...

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राजापूर येथील एका कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकू अशी धमकी दिल्याप्रकरणी रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितीली आहे. उदय सामंत यांना जाळून टाकू असं वक्तव्य त्यांनी राजपूर येथील सभेला संभोधित करताना कॉंग्रेस नेते नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी देण्यात आली होती.

दरम्यान तो धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा करत पुढील चौकशीची ग्वाही दिली. त्यानंतर आता जोशी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आता जोशी यांनी माफी मागितीली आहे.

उदय सामंत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहचत नसून सरकार आमची दखल घेत नाहीये. आम्हाला हा प्रकल्प नकोय, असे जोशी यांनी म्हटले आहे. सरकारकडून जी दडपशाही चालली आहे त्या अनुशंघाने माझ्याकडून जे काही शब्द निघाले त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असेही ते म्हणाले आहेत.

रिफायनरीचे विरोधक उदय सामंतांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी या कार्यकर्त्याने उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT