Atal Setu Inauguration 
महाराष्ट्र बातम्या

Atal Setu Inauguration: लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार; CM एकनाथ शिंदेंचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा अटल सेतू गेमचेंजर प्रकल्प असल्याचे शिंदे म्हणाले. अटल सेतूमुळे वेळ वाचणार आहे. दोन तासाचा प्रवास आता 20 मिनिटात होणार आहे.

Sandip Kapde

Atal Setu inauguration: महाराष्ट्रातील अटल बिहारी वाजपेयी शिवारी-न्हावा शेवा अटल पुलाचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर जाहीर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

एकूण 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 21.8 किमी लांबीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (MTHL) 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू' असे नाव देण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. हा गेमचेंजर प्रकल्प असल्याचे शिंदे म्हणाले. अटल सेतूमुळे वेळ वाचणार आहे. दोन तासाचा प्रवास आता 20 मिनिटात होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी भूमीपूजन केलं आणि त्यांनीच लोकार्पण देखील केलं.

अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, अशी घोषणा देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच राज्यात अबकी बार 45  पार ही आमची जबाबदारी असल्याचे शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भूकंप येणार आहे. हा भूकंप विरोधी पक्ष सहन करु शकणार नाहीत, असा इशारा देखील शिंदेंनी दिला. (Latest Marathi News)

विकासाची विरोधी लोकांनी नेहमी पोटदुखी होत असते. रावणाच्या अंहकाराचा नाश करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी रामसेतू तयार केला होता. तसेच ह्या सेतूमुळे अहंकारी लोकांचा नाश होणार आहे. अटल सेतूमुळे तिसरी मुंबई विकसित होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. देशाचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होत आहे. विकासासाठी केंद्र सरकार आमच्यासोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT