Shiv Sena Case 
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena Case: शरद पवारांच्या सांगण्यावरुन नरहरी झिरवळ नॉट रिचेबल? चर्चेला उधाण

सत्तासंघर्षाचा निर्णय अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या

धनश्री ओतारी

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निर्णय अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, झिरवळ हे रिचेबल असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशातच, शरद पवार यांच्या सांगण्यावरुन नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झालेत, या चर्चेने आता राज्यात उधाणं आलं आहे.(Narhari Zirwal Not Reachable Sharad pawar Uday Samant big statement Shiv Sena Case )

काल झिरवळ यांनी सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना, 'सुप्रीम कोर्टाने जरी निर्णय घेतला तरी कोर्ट 16 आमदारांना अपात्र ठरवेल किंवा तो माझ्याकडे आला तरीदेखील 16 आमदार अपात्र ठरतील, असे म्हणाले होते. दरम्यान आज राज्यात झिरवळ नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर उद्योमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणालेत उदय सामंत?

“ते का नॉट रीचेबल आहेत हे मला कसं कळणार? पण काल त्यांनी जे वक्तव्य केलं, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधी अशी वक्तव्य करणं योग्य आहे की अयोग्य आहे? एखाद्या जबाबदार पदावरील व्यक्तीनं असं सांगावं की १६ जणांचं प्रकरण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अपात्र ठरवेन हे घटनेला धरून नाही.

झिरवळ साहेबांना अजित पवार आणि शरद पवारांनी हे लक्षात आणून दिलं असेल. म्हणून ते कदाचित नॉट रीचेबल झाले असतील”, अशी खोचक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

तत्कालीन अध्यक्ष म्हणून निर्णय माझ्याकडेच येणार..

नरहरी झिरवाळ यांनी घटनाक्रम उलटा फिरेल असा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अपात्रतेच्या निर्णयाचा अधिकार मलाच मिळेल. सत्तांतराचा घटनाक्रम उलटा मागे फिरवला जाईल. त्यावेळी विधिमंडळाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पदभार होता. मी तत्कालीन अध्यक्ष म्हणून तो निर्णय घेतला होता.

आता जरी अध्यक्ष असले तरी त्यावेळी मी घेतलेल्या निर्णयामुळे कोर्टाकडून मलाच संधी दिली जाईल. मी आता उपाध्यक्ष नसतो तर कदाचित ही संधी मिळाली नसती. माझ्यावर अविश्वास ठराव मांडला गेला पण तो मंजूर झाला नाही असं त्यांनी दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT