Shivsena  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena MLA Disqualification : " सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत"; झिरवळांचं मोठं विधान

त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दत्ता लवांडे

Mumbai News : "सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील" असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास करून निर्णय दिला जाईल असं सांगितंल होतं. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेची निर्णय प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचं विधान केलं असून माध्यमांना बोलताना ते म्हणाले की, "सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही" असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय प्रक्रिया तातडीने घेण्यात यावी यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uchgaon Gram Panchayat news : ‘त्या’ मिळकती महापालिकेच्या हद्दीत उचगाव ग्रामपंचायतीला धक्का, सर्वोच्‍च न्यायालयाने स्थगिती उठवली

"ती खूप खुश झाली" राकेश बापटने सांगितली एक्स वाइफ रिद्धीची प्रतिक्रिया; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : शासकीय कर्मचारी संघटनेच्या संपाचा तिसरा दिवस, कामकाज ठप्प

तुमचे पिण्याचे पाणी सुरक्षित आहे का? पावसाळ्यापूर्वी पाण्याचा ‘हेल्थ चेकअप’ करण्याचा तज्ज्ञांचा इशारा

IPL 2026 Video: 'मॅचच्या आधी अजूनपण कार्टून बघतो, पण लक्ष क्रिकेटवर...' वैभव सूर्यवंशीचं उत्तर ऐकलं का?

SCROLL FOR NEXT