Tax Raid Esakal
महाराष्ट्र बातम्या

Tax Raid: नाशिकमध्ये आयकर छाप्यामध्ये बिल्डरांचे 3,333 कोटींचे बेहोशी व्यवहार उघड

करचुकवेगिरी, सरकारला फसवल्याचा संशय

अंकिता खाणे (Ankita Khane)

नाशिक परिसरामध्ये 7 बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या पथकाने गेली 6 दिवस छापे टाकले आहेत. काल (मंगळवारी ही कारवाई संपलेली आहे. या छापेमारी तब्बल 3333 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता व्यवहार समोर आले आहेत. तर साडे पाच कोटीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

‘दिव्य मराठी’ ने याबाबतची माहिती दिली आहे. आयकर विभागाची राज्यभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई, नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होतं. ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊस ठिकाणी छापे टाकले.

२० एप्रिलला पहाटे सहा वाजेच्या सुमारास सुरु झालेली कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली. या छाप्यामध्ये आयकर विभागाच्या हाती मोठी मालमत्ता लागण्याची शक्यताही वर्तवली जात होती. शहरात अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. त्यात कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT