Nashik Bus Accident
Nashik Bus Accident Sakal
महाराष्ट्र

Nashik Accident : बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले होते?

सकाळ डिजिटल टीम

नाशिक औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटे भीषण अपघात झाला. खासगी बस आणि कंटेनरची धडक झाल्यावर बसने पेट घेतला आणि यामध्ये होरपळून १२ मृत्यू झाले आहेत. आता या खासगी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ही बस चिंतामणी ट्रॅव्हल्स या कंपनीची होती. या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. त्याची चौकशी करून कारवाई होईल, असं जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं. राठोडांनी या प्रकरणी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला भेट देत प्रवाशांबद्दलची माहिती घेतली आहे. शिवाय, सुरक्षा यंत्रणेबद्दलचीही माहिती घेतली आहे.

यंत्रणेचंही अपयश

पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास अपघात झाल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी तातडीने 100, 112 या क्रमांकांवर संपर्क साधले. अँब्युलन्सला फोन केला, अग्निशमन दलाशीही संपर्क साधला. परंतु सहा वाजेपर्यंत घटनास्थळी कोणीही पोहोचू शकले नाही. पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना शहर बसमधून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मृतांनाही याच बसमधून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. बराच वेळाने 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. एकूणच या घटनेमध्ये आपत्कालीन व्यवस्था फोल ठरल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT