Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election : तिढा अजूनही कायम.... पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमध्ये घेतले अर्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.२६:नाशिक लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यात महायुतीला यश आलेले नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. आज अर्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतानाच पक्षाचा मतदारसंघावरील दावा कायम असल्याचे जाहीर केले आहे.

त्यांचे विश्वासू दिलीप खैरे यांच्यासाठी त्यांचे बंधू अंबादास खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या अर्जाबाबत बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी ‘ही जागा शिवसेनेची असल्याचे सांगत कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीची घोषणा करतील,’ असे जाहीर केले आहे. भाजपच्या पंकजा मुंडे यांनी काल नाशिकमधून प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र त्याबाबत महायुतीतील घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ही चर्चा तूर्तास थांबली आहे.

भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघांमधून भाजप-महायुतीच्या उमेदवारांनी गुरुवारी (ता. २५) अर्ज दाखल केल्यानंतर आता पक्षाला बड्या नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा आहे. जिल्हा भाजपने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी यांच्या सभांची मागणी केली आहे. प्रत्यक्षात अद्याप कुठल्याही सभेची तारीख निश्‍चित झालेली नाही. जळगाव व रावेर यासह खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रिंगणात आहेत. धुळे, नंदुरबारला पाचव्या टप्प्यात २० मे रोजी तर जळगाव व रावेर मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्हा भाजपने केंद्रीय मंत्र्यांसह बड्या नेत्यांच्या सभांसाठी तारखा मागविल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT