nashik market
nashik market esakal
महाराष्ट्र

नाशिक बाजार समितीत शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करत केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi) आक्रमक झाले आहे. त्यासाठी त्यांनी आज सोमवारी (ता.११) राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसह शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे पक्ष अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या बंदमध्ये सहभागी होण्याच्या निर्णय नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने (nashik market committee) घेतला आहे.

मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये सोमवारी नाशिक बाजार समिती सहभागी झाली. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितीच्या बाहेर एक मोठा फलक लावून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर

लखीमपूर हिंसाचाराविरोधात पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेनेही विरोध दर्शवला आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांचा राजकीय सोयीसाठी वापर केला जात आहे. हे भांडण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आहे. यात शेतकऱ्यांना सुळावर दिले जात आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष शंकरराव ढिकले यांनी केला आहे

उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा - पेशकार

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या उद्योग आघाडीने विरोध केला आहे. उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांनी व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले आहे. दुकान बंद करण्यास बळजबरी झाली तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढून गुन्हे दाखल करू, असा इशारा पेशकर यांनी दिला आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने जरूर आंदोलन करावे. मात्र, आधीच कोरोनाने व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. त्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना दबावाखाली न ठेवता व्यापार सुरू ठेवावा, असे आवाहन पेशकार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT